शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विधानसभा निवडणूक : युती, आघाडीच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 06:24 IST

वंचित फॅक्टरवर अनेकांचे लक्ष : बुलडाणा आणि चिखली विधानसभेतील तिकीट वाटपात लागणार कस

नीलेश जोशी

बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीच्या जागा वाटपाचा ताळमेळ कसा बसतो यावर जिल्ह्यातील बहुतांश राजकीय समिकरणे अवलंबून राहणार आहेत. मात्र ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही तितकीच प्रतिष्ठेची आहे.नवे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे आणि सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान मिळवणारे शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची परीक्षा पाहणारी असणार आहे. आघाडी अंतर्गत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून युती मात्र निश्चित असल्याची स्थिती आहे.

जळगाव जामोदमध्ये कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, मलकापूरमध्ये भाजपचे जेष्ठ नेते चैनसुख संचेती आणि खामगावमधून अ‍ॅड. आकाश फुंडकर , मेहकर आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात अनुक्रमे शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर हे उमेदवार राहतील, असे दिसते. दुसरीकडे काँग्रेसला बुलडाणा आणि चिखली या आपल्या ताब्यातील दोन्ही जागा कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागली आहे लोकसभा निवडणुकीत एक लाख ३३ हजार मतांनी पराभव झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विधानसभा निवडणुकीत पुन्हा सिंदखेड राजा येथून भाग्य आजमावणार आहेत.वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत एकीकडे आघाडीला ‘वंचित’मुळे मोठा फटका बसलेला असतानाच युतीचे मताधिक्यही चार टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रसंगी तिरंगीलढत होण्याची शक्यता नाकारतायेत नाही. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतकोणती जागा मागते, हा कळीचामुद्दा आहे.काँग्रेसने मलकापूरची जागा ही मुस्लीम समाजासाठी सोडावी, असा सूर निघत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर मलकापूर विधानसभेची जागा त्यांंना मिळावी, असा प्रयत्न चालविला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली मेहकर विधानसभेची जागा काँग्रेसने मागितली आहे युती झाल्यास बुलडाणा आणि चिखली मतदारसंघात खºया अर्थाने चुरस राहणार आहे.बुलडाणा पारंपरिक शिवसेनेचा तर चिखली भाजपकडे आहे. मात्र शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील शहकाटशहचे राजकारण सर्वश्रूत आहे. त्यामुळे येथे विधानसभेच्या तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहे. अशीच स्थिती चिखलीमध्ये भाजपची आहे.भाजपमध्ये माजी आमदार रेखाताई खेडकर यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्याने स्पर्धा आणखी वाढली आहे.२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :मेहकर : डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)। मते : ८०,८८१,फरक ३६,३४८सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : जळगाव जामोद : प्रसेनजीत पाटील (भारिप) - ४,६९५ ( विजयी - डॉ. संजय कुटे, भाजप, मते-६३,८८८).एकूण जागा : ७ । सध्याचे बलाबल : भाजप - ३, शिवसेना - २, कॉँग्रेस-२ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMumbaiमुंबईvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक