शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावरखेड जवळ आठ लाखांची लुट करणारे चारही आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:49 IST

खोदकामात सापडलेले दोन किलो सोने देतो असे सांगून इसारापोटी दिलेले आठ लाख रुपये घेऊन पलायन करणार्या चार आरोपींना सिंदखेड राजा पोलिसांनी अवघ्या ३० तासात अटक केली आहे. दरम्यान, यातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित दोन आरोपींनी सिंदखेड राजा पोलिसांनी गुरूवारी रात्री आटक केली.

ठळक मुद्देसिंदखेड राजातील घटना दोन किलो सोने देतो असे सांगून पळवले होते पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : खोदकामात सापडलेले दोन किलो सोने देतो असे सांगून इसारापोटी दिलेले आठ लाख रुपये घेऊन पलायन करणार्या चार आरोपींना सिंदखेड राजा पोलिसांनी अवघ्या ३० तासात अटक केली आहे. दरम्यान, यातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित दोन आरोपींनी सिंदखेड राजा पोलिसांनी गुरूवारी रात्री आटक केली.वीस लाखात दोन किलो सोने देतो असे म्हणत २८ नोव्हेंबला एकास आठ लाख रुपयांनी लुटल्याची घटना सिंदखेड राजा शहरानजीक सावखेड तेजन फाट्यानजीक घडली होती. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील गोळेगाव येथील ३६ वर्षीय निवृत्ती प्रल्हाद शेळके यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी लगोलग तपास करत अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक केली होती. चांगेफळ येथील शिवशंकर सखाराम शिंदे, सुनील सखाराम चव्हाण (रा. देवखेड) यांचा यात समावेश होता. त्यांना न्यायालयाने दोन डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान उर्वरित दोन आरोपी ज्ञानेश्वर भरत शिंदे (रा. खापरखटी खामगाव), अंकुश संपत भालेराव (खापरखुटी खामगाव) यांना पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, रमेश गोरे, गणेश काकड, योगेश रत्नपारखी, वैशाली कोरडे यांनी  जेरबंद केले. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ नलावडे आणि ठाणेदार बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखआली संतोष नेमणार हे करीत आहेत. 

अशी घडली घटनाबाजारात एक किलो सोन्याची किंमत ३० लाख होत असतांना दोन किलो सोने केवळ २० लाखात मिळते ही बाबच संशयाची असताना शिवशंकर सखाराम शिंदे यांनी गावातीलच व्यक्तीला कमी भावात सोने मिळवून देतो म्हणून मुरलीधर म्हस्के या व्यक्तीला मोहजाळ्यात ओढले. ऐवढेच नाही तर आरोपीतांनी सोनेही  त्यांना दाखविले. त्यामुळे शिवशंकरवर विश्वास ठेवून मुरलीधर म्हस्के यांनी जावाई निवृत्ती उर्फ बंडू प्रल्हाद शेळके (रा.गोळेगाव ता.जाफ्राबाद, जि. जालना) यांचेशी संपर्क साधून उपरोक्त प्रकार सांगितला. निवृत्तीनेही सोन्याची खात्री करुन घेतली. चिखली येथील एका बँकेतून आठ लाख रुपये काढून ठरल्या ठिकाणी सावखेडतेजन फाट्याजवळील ते २८ नोव्हेंबरला जंगलात पोहचले. एकमेकाला पैसे आणि सोने दाखवित निवृत्ती शेळके यांनी ८ लाख रुपये शिवशंकर शिंदे यांच्याजवळ दिले. पैसे घेवून शिवशंकर हा झुडूपात गेला आणि सोबत्याजवळ पैसे देवून घटनास्थळावरुन बुधवारी तो फरार झाला. त्यानंतर निवृत्ती शेळके यांनी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाCrimeगुन्हा