ते मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे शनिवारी गीता जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनात बोलत होते. हरिभक्त परायण पंडितराव देशमुख यांनी उमरा येथे सुरू केलेल्या गीता जयंती उत्सवाची परंपरा आजही जपली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गीता जयंती साजरी करण्यात येत आहे. भजन, कीर्तन व महाप्रसाद वितरणाने हा सोहळा दरवर्षी थाटात साजरा करण्यात येतो. रूपराव देशमुख हे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. २५ डिसेंबर रोजी गीता जयंतीच्या दिवशी दिवसभर गीता पाठ घेण्यात आले. त्यानंतर रात्री महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी गोपाल पितळे महाराज यांचे प्रवचन व काल्याचे अभंग घेण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वितरणाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
ज्ञानेश्वरी पारायण, रामायण तथा अखंड हरिनाम सप्ताह
मेहकर : तालुक्यातील अंत्री देशमुख येथे गीता जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रामायण तथा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. महाप्रसाद वितरणाने शनिवारी या सप्ताहाची सांगता झाली. ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व नागरे महाराज, सरंबा, संगीत रामायण संतोष महाराज, खडसे बोरी यांच्या रसाळ वाणीतून झाले. १९ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत गीता जयंती सोहळा पार पडला आहे. या मध्ये परमेश्वर महाराज देशमुख, अनिल महाराज देशमुख, श्रीधर महाराज, अकोला, संजय महाराज देशमुख, अंधृड यांचे कीर्तन झाले. २६ डिसेंबरला सकाळी ९ ते ११ वाजता संतोष महाराज खडसे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात संपूर्ण अंत्रीवासीयांनी परिश्रम घेतले.