शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:00 IST

सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पंधरवाड्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे. या रकमेत झालेला खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ गुरुवारी मांडली.पाऊस पुर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पीके काढण्यास सुरवात केली. माल जास्त खराब झाला असल्याने साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकºयाकडून हा माल विक्रीसाठी बाजार समितीत आणण्यात येत आहे. मात्र बाजार समिती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन ते तीन दिवसापासून शेतकºयांच्या मालाची खरेदी होत नसल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी ंिचंतातूर झाले आहेत. बुधवारी, १३ नोव्हेंबररोजी खामगाव बाजारपेठेत ज्वारी विक्रीसाठी आणली होती. पावसाने ज्वारीचा दर्जा घसरला. त्यामुळे व्यापाºयांनी पुर्णपणे खरेदीकडे पाठ फिरवल्याने ज्वारी खरेदी होवू शकली नव्हती. अखेर काही शेतकºयांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या.बाजार समितीचे प्रशासक महेश कृपलानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज या शेतकºयांची ज्वारी खरेदी होवू शकली. हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला. गुरुवारी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणण्यात आले होते.यामुळे काही प्रमाणात गोंधळ उडालेला दिसून आला. बाजार समितीचा कारभार वाºयावर असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. सध्या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे इतरही पदभार असल्याने बाजार समितीच्या कारभाराकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून बाजार समितीतील कारभार सुरळीत करण्याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

दिवाळी झाली तरी कापसाचा पत्ता नाही!दसरा किंवा दिवाळीला शेतकºयांच्या घरात कापूस भरलेला राहतो. यावर्षी मात्र दिवाळी झाली तरी कापसाचे बोंडही नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गत पंधरवाड्यात झालेल्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. कपाशीच्या बोंड्या गळून पडल्याने शेतकºयांवर आर्थीक संकट कोसळले आहे. अनेक शेतकºयांनी तर कपाशीचे उभे पीक नांगरून टाकले आहे.

मी सोयाबीन उत्पादक शेतकरी असून बाजारसमितीत सोयाबीन विक्रीला आणले होते. सोयाबीनला गेल्या वर्षीपेक्षा अर्धाही भाव मिळाला नाही.- श्रीकृष्ण आसोलकर,येऊलखेड.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी