शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:27 IST

जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी राज्यातील बाजार समितींच्या कर्मचाऱ्यांनी ५ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला. बुलडाणा, खामगाव, मलकापूर, चिखली या मुख्य बाजार समितींसह इतर बाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले असून शेतकºयांना याचा फटका बसत आहे.मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर काही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६ हजार ८७७ कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बाजार समिती कर्मचारी संघटनेने हा लढा पुकारला आहे. जिल्ह्यातील अडीचशेच्या वर कर्मचाºयांचा संपात सहभाग आहे. शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती, मार्केट यार्डच्या बाहेरील धान्य नियमन मुक्तीचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचा सेस बंद करुन सेवाशुल्क आकारणी भरण्याबाबत निर्णय घेण्याचा शासन विचार करीत आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. काही बाजार समिती कर्मचाºयांचे १० ते २० महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तेलंगणा व तामिळनाडू राज्यातील बाजार समित्यांच्या कर्मचाºयांप्रमाणे राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाºयांची मुख्य मागणी आहे.बुलडाणा येथील बाजार समितीचे कामकाज सकाळपासून बंद ठेवण्यात आले. बाजार समिती सचिव वनिता साबळे, दिगंबर दांदडे, बबन निकम, जितेंद्र गवई, दीपक चव्हाण, सुनील काळवाघे, शशांक जेऊघाले, वर्षा भोंडे यांच्यासह इतर कर्मचारी संपात सहभागी झाले. हमाल मापारी संघाचा पाठींबाशासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी सोमवारपासून संप पुकारला. जिल्ह्यातील १३ बाजार समिती व उपबाजार समितीत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हमाल मापारी कामगार सेनेने संपाला पाठींबा जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे जिल्हा प्रतिनिधी विलास पुंडकर यांनी दिली.

वरवट बकाल येथील उपबाजारातील धान्य लिलाव बंदवरवट बकाल : बाजार समिती कर्मचºयांना राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ५ आॅगस्टला संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांनी कार्यालयीन कामकाज बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कार्यालयाच्या मुख्यालयासमोर ठाण मांडून शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सोमवारला वरवट बकाल उपबाजारातील धान्य लिलावसुद्धा बंद होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarket Yardमार्केट यार्डStrikeसंप