शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पीक संरक्षणासाठी कृषी सहाय्यकांची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 12:46 IST

हिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत  कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देपिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. कीड रोगांच्या निरीक्षणाच्या माहितीवरुन क्षेत्रीय कर्मचाºयांच्याद्वारे पीक संरक्षणाचे सल्ले देण्यास सुरवात झालेली आहे.

- ओमप्रकाश देवकरहिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत  कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे.सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकावरील कीड, रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. सन २०१६ -१७ पासून हा प्रकल्प पूर्णपणे आॅनलाईन झाला आहे. सन २०१८-१९ मध्ये हा प्रकल्प कृषी विभागातील कर्मचाºयां मार्फत राबविण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार अंमलबजावणीला सुरूवात झालेली आहे. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा पिकांकरीता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसीत संगणक प्रणालीचा वापर करून शेतकºयांना कीड रोगांच्या निरीक्षणाच्या माहितीवरुन क्षेत्रीय कर्मचाºयांच्याद्वारे पीक संरक्षणाचे सल्ले देण्यास सुरवात झालेली आहे.शेतकºयांमध्ये कीड, रोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षीत करुन कीड, रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे. प्रादुभार्वाबाबत जागरुकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. किडरोगांच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळणे, वारंवार येणाºया किडरोगांबाबत सांख्यिकी माहिती संकलीत करणे व कायम स्वरुपाच्या व्यवस्थापना बाबत कृषि विद्यापीठांच्या सहाय्याने शिफारशी निश्चित करणे. हाच प्रकल्प राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे.

अशी राबिवली जाणार कार्यप्रणालीप्रत्येक कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांना आठवड्यातून दोन गावे व प्रत्येक गावात दोन निश्चित प्लॉट याप्रमाणे एकूण चार निश्चित प्लॉटवरील पिकांचे सर्वेक्षण करणे अनिवार्य आहे. प्रत्येक मंडळ कृषि अधिकाºयांना एकूण चार प्लॉटवरील पिकांचे सर्वेक्षण करावे लागते. 

कृषीदुतांना दिले प्रशिक्षणया प्रकल्पाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी कृषी महाविद्यालयातील कृषी कायार्नुभव सत्राचे विद्यार्थी यांची मदत घेण्याच्या आयुक्तालय यांच्या सूचना आहेत. त्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम व समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषी कायार्नुभव सत्राचे विद्यार्थी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

सद्य:स्थितीत सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावात लवकर लागवड केलेल्या कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा पादुर्भाव अढळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी फेरोमेन सापळे लावणे, किटकनाशकाची फवारणी घेणे याबरोबरच पादुर्भावग्रस्त शेतातील डोमकळ्या काढून त्या नष्ट केल्यास पुढील प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.- नारायणराव देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी