शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको- चौधरी

By निलेश जोशी | Updated: October 26, 2023 19:29 IST

देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाला आहे.

बुलढाणा : अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. आता अग्निवीर वीरगतीला प्राप्त होत असल्याने या योजनेतील कच्चे दुवे स्पष्ट होत आहे. सोहतच भारतीय सैन्यदलात यामुळे उभी फूट पडू शकते, अशी टीका काँग्रेसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल रोहित चौधरी यांनी २६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे केले.

देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते २६ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे आले होते. त्यानंतर बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन योजनेतील फोलपणा, कच्चे दुवे व देश सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेच्या माध्यमातून केंद्रातील सरकारवर टीका करताना भारतीय सैन्यात नियमित सैनिक व अल्पकाळ सेवा करणारे अग्निवीर अशी फूट पाडल्या गेली आहे.

काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी हा धोका आधीच अेाळखत या योजनेला प्रखर विरोध केला आहे. दरम्यान नियमित सैनिक व अग्निवीर यांना मिळणारे वेतन, आर्थिक लाभ, सेवा काळ, यात मोठी तफावत आहे. अग्निवीराला पेन्शन, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा नाहीत. तारुण्यातच ते निवृत्त होतील. त्यातच माजी सैनिकांचा दर्जा नसल्याने सैन्याकडून मिळणारे अनेक लाभही त्यांना मिळणार नाहीत. शहीद अग्निवीर अक्षय गवतेंमुळे आता अनेक बाबी समोर येत असल्याचे चौधरी म्हणाले.

दरम्यान सैनिकाला दीर्घ प्रशिक्षण गरजेचे आहे. ऑल वेदरमध्ये कार्यरत राहण्यासाठी सैनिकाला किमान सहा वर्षे लागतात. येथे अवघ्या सहा महिन्यांत अग्निवीराला संवेदनशील ठिकाणी तैनात केल्या जात आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, असे ते म्हणाले. पंजाबमधील शहीद अग्निवीराला मानवंदना सारखा सन्मानसुद्धा मिळाला नाही. यामुळे येत्या पाच वर्षांत भारताची सैनिक संख्या घटून दहा लाखांच्या आसपास येईल. त्यातही अग्निवीरांची संख्या अधिक असेल असे ते म्हणाले. त्यामुळे ही योजना बंद करण्याची मागणीच त्यांनी केली.---

अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटंबाला एक कोटी रुपये द्यावेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद अक्षय गवतेच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर करणे ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया चौधरींनी दिली. सोबतच ही योजना कायम ठेवायची असेल तर नियमित सैनिक व अग्निवीर यामधील भेद दूर करून ते समान पातळीवर आणावेत. केंद्र व राज्याचेही सैनिकाप्रती दायित्व आहे. शहिदाला १ कोटीची मदत, घरातील एकाला शासकीय नोकरी, १० एकर शेती देण्याची मागणी चौधरी यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, समन्वयक संदेश सिंगलकर, आ. धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेस