शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:31 IST

सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

बुलडाणा : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून संजय ताकतोडे यांनी बीड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. या घटनेस भाजप सरकार जबाबदार असून या सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून अ, ब, क, ड च्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने विविध आंदोलने केली. परंतू अद्यापही शासनाने समाजाला न्याय दिला नाही. यामुळे नैराश्यापोटी संजय ताकतोडे यांनी बिड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. ही घटना समाजासाठी अत्यंत दुदैवी असून माणूसकिला काळिमा फासणारी आहे. या घटनेला भाजप शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे सांगत मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी क्रांतीविर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी सदस्य विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात चिखली- बुलडाणा मार्गावर काही वेळ ठिय्या मांडला. संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्ट व कलम ३०२ प्रमाणे गुन्हे दाखल करा, संजय ताकतोडे यांच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची मदत द्या, त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकिय नोकरीत सामावून घ्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकºयांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात श्रीकृष्ण शिंदे, निवृत्ती तांबे, गजानन पवार, नारायण जाधव, एस. टी. सोनुने, पी. डी. महाले, ओमप्रकाश नाटेकर, भगवान गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, लता निकाळजे, हिंमतराव यंगड, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, अनिल कांबळे, आकाश जाधव, पुंडलिक बावस्कर, मधुकर महाले, शंकर अवसरमोल, अंजली खुपराव, विजय पारेकर, सोनु सुरडकर, सुभाष निकाळजे, एच. ए. मानवतकर, डॉ. बी. आर. दाभाडे, संजय गायकवाड, अनिल भालेराव, संजय नामदेव गायकवाड सहभागी झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय