शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 26, 2023 17:03 IST

सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बुलढाणा : जिल्ह्यातील दोन हजार ग्रामीण व शहरी भागातील आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी २६ जुलै रोजी तालुकास्तरावर केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन केले. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आशा व गटप्रवर्तकांनी घरोघरी जाऊन लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी काम केले. त्यामध्ये देशातील शेकडो आशा सेविका ह्या मृत्युमुखी पडल्या. त्यांना कुठलाही मोबदला या सरकारने दिला नाही. एवढेच नव्हे, तर गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही वाढ केंद्र सरकारने त्यांच्या मानधनात केली नाही. एकीकडे प्रचंड महागाई वाढत असताना आशा सेविकेला मानधन वाढ द्यायला सरकारजवळ पैसा नाही. विविध योजनेत काम करणाऱ्या महिलांना जगण्याइतकेही मानधन हे सरकार देत नसल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी सरकारवर केला.केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करून त्यांना किमान २६ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारकडे करण्यात आली. तसेच मणिपूर येथे आदिवासी महिलांची धिंड काढून त्यांच्यावर जो अत्याचार करण्यात आला, या घटनेचासुद्धा संघटनेकडून निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, ललिता बोदडे, जयश्री तायडे, सिंधू अवसरमोल, सुरेखा पवार, कविता चव्हाण, शारदा लिंगायत, गारमोडे, ललिता साळवे, सुमित्रा लिहिणार आदींनी केले.

टॅग्स :agitationआंदोलन