वाशिम जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:12 PM2019-03-06T13:12:14+5:302019-03-06T13:16:58+5:30

वाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे.

Agitation of employees in Washim Zilla Parishad continues on the next day | वाशिम जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

वाशिम जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने कामकाज ठप्प पडले.
यासंदर्भातील कर्मचारी संघटनेच्या निवेदनानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करित असताना जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या वादात कर्मचाºयांना दमदाटी करून शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप कर्मचारी संघटनांनी पदाधिकाºयांविरूद्ध कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पदाचा गैरवापर करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गवळी यांचे सदस्य पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाºयांनी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन पुकाीले आहे. ६ मार्च रोजीही आंदोलन सुरूच आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर आंदोलनावर कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Agitation of employees in Washim Zilla Parishad continues on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.