शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अकोला-खंडवा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्यातून वळविण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 19:25 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा असलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले. अकोला-खंडवा रेल्वे मार्गात अकोट ते अमला खुर्द ७७ कि. मी., अमला खुर्द ते खंडवा ५४ कि. मी. असे हे काम होत आहे. अकोट पर्यंतचे काम पूर्ण झाले. मात्र अकोट ते अमला खुर्द हा ३५ कि. मी. चा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने वादात आहे.गेल्या अनेक दिवसापासून या प्रकल्पाला विरोध होत आहे. ३५ पैकी १८ किमीचा मार्ग हा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे या भागातून गेज परिवर्तनाला पर्यावरणवादी, निसर्ग मित्र, वन्यजीव प्रेमी, विविध संस्थांकडून विरोध होत आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग रद्द करून अकोट, हिवरखेड, सोनाळा, जामोद मार्गे खंडवा करण्याची मागणी करण्यात आली.केंद्र शासनाने व्याघ्र प्रकल्पातून रेल्वे मार्ग काढल्यास वन्यजीव धोक्यात येणार आहेत. त्यामुळेच रेल्वे मार्ग व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेरून करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सगोडा-वारखेड फाट्यावरील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळघाटातील वाघांचे अधिवास सुरक्षित राहीलमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून रेल्वे गेज परिवर्तनाचे काम केल्यास वन्यजीव व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. जैव विविधता व जंगलाचे संरक्षण व संवर्धन होईल. पर्यायी मार्गाने २ लाखापेक्षाही अधिक प्रवाशांचा फायदा होणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तर बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जा. तालुक्यासाठी हा रेल्वे मार्ग वरदान ठरेल. या दुर्गम भागातील असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मागासलेल्या भागात विकासाला चालना मिळणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणSangrampurसंग्रामपूरMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प