शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी चोपडे विरोधात पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:06 IST

शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील प्लॉट खरेदी - विक्री घोट्याळ्याचा मुख्य सुत्रधार आणि गत महिनाभरापासुन फरारी असलेल्या निलंबित तलाठी राजेश चोपडे विरोधात अखेर महसुल प्रशासनाने बुधवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परिणामी चोपडेच्या अडचणित आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. _खामगाव मंडळातील भाग १ चा तलाठी राजेश चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, छेडछाड तसेच पाने फाडून मोठया प्रमाणात प्लॉट खरेदी विक्रीचा घोटाळा केल्याचे बिंग काही दिवसांपुर्वीच फुटले. फसवणुक झालेल्या नागरिकांच्या तक्रारीवरुन तलाठी चोपडे विरोधात यापुर्वीच शहर पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन नेमण्यात आलेल्या ९ सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात गंभिर आक्षेप आढळून आले. नागरिकांची फसवणुक झाली. शासकीय दस्तवेजाची खाडाखोड करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार डॉ. शितल रसाळ यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी सुर्यकांत सातपुते यांची महसुल प्रशासनाच्या वतीने नेमणुक करण्यात आली. ९ सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी मंडळ अधिकारी सातपुते यांनी शहर पोलीसांना तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी तलाठी राजेश चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. या तक्रारीमुळे खामगाव शहर एकच खळबळ उडाली आहे. तलाठी चोपडे अद्यापही फरारीच !तलाठी चोपडे विरोधात गत महिना भरापुर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासुन चोपडे हा फरार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने चोपडे ची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. तरीदेखील चोपडे पोलीसांच्या नजरेत धुळ फेकुन फरार असल्याचे दिसून येते. ९४ जणांची फसवणुक !जुन २०१५ ते मे २०१९ या कालावधीत संगणकिय ७/१२ अद्ययावत करतांना तलाठी चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, व्हाईटनर लावणे, मुळ दस्तवेज फाडून फेकणे, रद्द झालेले फेरफार पुन्हा तयार करणे यांसारख्या प्रकाराचा वापर करुन प्लॉटचे मालक बदलविले. हे प्लॉट दुस?्यांना विकुन ९४ जणांची फसवणुक केल्याचे मंडळ अधिकारी सातपुते यांनी तक्रारीत नमुद केले आहे. 

 तलाठी चोपडे याच्या विरोधात महसुल प्रशासनाकडून शासकीय दस्तवेजात छेडछाड करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने फरारी तलाठी चोपडे विरोधात नव्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा कसुन शोध घेत आहेत. - सुनिल अंबुलकर, निरिक्षक शहर पोलीस स्टेशन खामगाव

 निलंबित तलाठी चोपडे याने अक्षम्य चुका केल्याचे समोर येत आहे. चौकशी समितीच्या अहवालातही चोपडेने गंभिर गुन्हे केल्याचे उघडकिस आले. त्यामुळे चोपडे विरोधात तक्रार देण्यासाठी मंडळ अधिकारी सातपुते यांना प्राधिकृत करण्यात आले. सातपूतेंनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी चोपडे विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. - मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी