शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतरही शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम अपुर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:16 IST

शेगाव : तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम पुर्णत्वास येवू शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. त्यामुळे यंदा वाट खडतर असल्याने वारकऱ्यांसह भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे.संतनगरीत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात. यासह अनेक उत्सव काळात भजनी दिंड्यासह पायीवारी करणारे भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात श्रींची पालखी पंढरपूर येथून ६ रोजी खामगावरून लाखो भक्तांच्या पायीवारीसह शेगावला दाखल होणार ज्या खामगाव शेगाव या १६ कि.मी. रस्त्यांचे काम गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे ते आजही अपुर्णच आहे. हा पालखी मार्ग व भक्तांसाठी रस्त्यांच्या दुतर्फा जाण्या-येण्यासाठी वेगळा मार्ग तोही आजमितीस अपूर्णच का? असा सवाल भक्तांकडून उपस्थित केला जातोय.शेगाव ते खामगाव हा १६ किमीचा रस्ता बांधकामात कित्येकाचे प्राणाची आहुती या नियोजन शुन्य बांधकामाने द्यावी लागली. याला जबाबदार कोण हा प्रश्नही महत्वाचा ठरतो? ज्या कामाची गुणवत्ता नसल्यामुळे बहूतांश वेळा झालेल्या रस्ता हा उखडला खरा पण नियोजित वेळेत अद्यापही गुणवत्ता पुर्ण कामाची प्रतीक्षा हे भक्तांना करावी लागत आहे. पंढरपूर येथून परतीच्या प्रवासात खामगाव येथून लाखो भक्तांची मानवी साखळी दरवर्षी अन्नवानी पायांनी शेगावला येत असते. रस्त्यांच्या दुतर्फी गिट्टीचे ढिग व बारीक चुरडी व पेव्हरब्लॉक यासह रस्त्यावर बारीक चुरी रात्री अंधारात भरधाव वाहकांना न दिसल्यामुळे अपघात घडले आहेत. या कामाची गती काम मंदावली असतांना लोकप्रतिनिधींकडूनही कोणतीही विचारपूस केली जात नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. केवळ एका वर्षातच शेगाव- पंढरपूर मार्ग पुर्ण होईल असे आश्वासन मिळाले होते. मात्र आजरोजी अडीच वर्षाचा कालावधी उलटला तरी काम पुर्ण न झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पायदळ वारीत सहभागी भक्तांना त्रास सहन होवू नये म्हणून दुतर्फा पायदळ मार्ग सुद्धा स्वतंत्र कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्याचेही काम अनेक ठिकाणी अपुर्ण आहे. सध्या पावसाळ््याचे दिवस असल्याने निश्चितच भक्तांना या खडतर वाटेतूनच श्रींच्या दर्शनाला यावे लागणार आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगावhighwayमहामार्ग