शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:46 IST

मेहकरातील दुर्घटनेनंतर इतर पालिकांकडून माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दिडशे वर्ष जुन्या असलेल्या इमारतीने मेहकर शहरात तीन बळी घेतल्यानंतर जिल्ह्यातील नगर पालिकांना जाग आल्याचे वास्तव शुक्रवारी पाहावयास मिळाले. नगर पालिकांकडे शहरातील धोकादायक घरे, इमारतींची माहिती उपलब्ध नाही; परंतू मेहकरातील दुर्घटनेनंतर इतर पालिकांकडून माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्ह्यात १०० ते १५० वर्षापूर्वीची घरे, ब्रिटीश कालीन इमारती आजही वापरात आहेत. काही ठिकाणी तर शासकीय कामकाजही ब्रिटीश कालीन इमारतींमधे सुरू आहे. धोकादायक इमारतीने मेहकर शहरातील तीन बळी गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर पालिकांमधील परिस्थिती पाहली असता, शहरातील धोकादायक इमारतींची अथवा घरांची कुठलीच माहिती पालिकांकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले. यासंदर्भात कुठलाही सर्वे आजपर्यंत झाला नाही; तर काही मुख्याधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतीची माहिती आता घेऊ, असे सांगितले. पालिकांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही अधांतरीच राहत आहे.

काय म्हणतात मुख्याधिकारी..?मेहकर शहरातील धोकादायक इमारतींबाबत माहिती उपलब्ध नाही. सर्वे करून माहिती घेण्यास संबंधीत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.- सचिन गाडेमुख्याधिकारी, न. प. मेहकर.सिंदखेड राजा शहरात दोन इमारती धोकादायक वाटत होत्या. त्यांना तेंव्हाच नोटीस देण्यात आल्या. आता सर्वे करण्यात येईल.- धनश्री शिंदे,मुख्याधिकारी, सिंदखेडराजाधोकादायक इमारती संदर्भात स्ट्रक्चरल आॅडीट झालेले नाही. परंतू लोणार शहरामध्ये धोकादायक अशा इमारती किंवा घरे नाहीत.- विठ्ठल केदारे,मुख्याधिकारी, न. प. लोणार.देऊळगाव राजा शहरामध्ये तीन घरे धोकादायक होती त्यांना तातडीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. धोकादायक इमारती नाहीत.- निवेदीता घारगे,मुख्याधिकारी, देऊळगाव राजा

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना