शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:45 IST

बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.

बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.गेल्या सात दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असून बँकेशी संबंधित ग्राहकांसह इतरांनाही याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे बँकेसह इतर ठिकाणच्या कामांनाही ब्रेक लागला आहे. जिल्हाभर बीएसएनएलचे जाळे पसरले असून शासकीय, निमशासकीय कार्यालयांतही बीएसएनएल सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, बीएसएनएलची सेवा वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांसोबतच बँक आणि शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. बीएसएनएल सेवा कधी सुरळीत होणार, असा प्रश्न या विभागातील अधिकाऱ्यांना केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे. बीएसएनएलची सेवा सुरूळीत करण्यासाठी प्रशासनाची दिरंगाई मोठे नुकसान करत आहे. शहरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार ग्राहकांसाठी नवीन नाहीत. कधी नगरपालिकेचे खोदकाम, तर कधी बीएसएनएलच्या केबल तुटल्याने ही सेवा सतत बंद पडते. सध्या जिल्हाभर रस्त्याची कामे सुरू असल्याने बीएसएनएलची सेवा विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपासून जिल्ह्यातील इंटरनेट बंद असल्याने बँकेचे व्यवहारही ठप्प होत आहेत. अन्य कार्यालयांतील आॅनलाईन कामकाज बंद झाल्याने नागरिकांची गरसोय होत आहे.मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’! बँकामध्ये वाढल्या अडचणीआतापर्यंत बँकामध्ये मार्च एन्डीगची कामे सुरू होती. त्यामुळे ग्राहकांचे अनेक व्यवहार थांबले होते. परंतू मार्च एन्डींग संपताच बँकामधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने पुन्हा बँकेत ग्राहकांची कामे लांबणीवर पडत आहेत.रस्ता कामाचा खोडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्याच्या कामासाठी होत असलेल्या खोदकामामुळे बीएसएनएलचे केबल तुटत आहेत. बीएसएनएलची केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा बंद पडते. खोदकाम चालू असताना या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे थांबणे आवश्यक असताना केबल तुटल्यानंतरही त्याची दुरूस्ती केल्या जात नाही. त्यामुळे अनेक दिवस बीएसएनएलची सेवा विस्कळीत राहते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBSNLबीएसएनएल