शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

६० दिवसांनंतर पालखी शेगावात, मायभूमीत स्वागताला भाविकांचा अलोट जनसागर!

By अनिल गवई | Updated: July 24, 2023 11:56 IST

श्रींची पालखी पोहोचली शेगावात: पालखीसोबत असलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत

अनिल गवईखामगाव: विदर्भपंढरीनाथ श्री गजानन महाराजांच्या पालखीने सोमवारी पहाटेच संतनगरी शेगावकडे प्रस्थान केले. विदर्भ माउलीवर श्रध्देचा अभिषेक करताना, हजारो भाविकांनी पालखीसोबत तब्बल १७  किलोमीटर अंतराचा पायी प्रवास केला.  पहाटे ५ वाजता खामगाव येथून निघालेली श्रींची पालखी सकाळी ०९:४१ वाजता शेगावात पोहोचली. यावेळी भाविकांचे एक टोक शेगावात तर दुसरे टोक खामगावात होते.त्यामुळे सोमवारी खामगाव -शेगाव पालखी मार्गावर भाविकांचा उलोट जनसागर उसळल्याचे दिसून आले.  श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीने २६ मे रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर असलेल्या पालखीने शेवटचा मुक्काम खामगाव येथे केला. भाविकांच्या श्रध्देचा पाहुणचार स्वीकारून सोमवारी पहाटेच श्रींची पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. श्रींची पालखी शेगाव येथे जात असतानाच, हजारो भाविकांनीही पालखी सोबत पायदळ वारी केली. अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील नव्हेतर जळगाव खांदेश, जालना आणि अमरावती येथील हजारो भाविकांनी यात सहभाग नोंदविला. आपली वाहने खामगाव येथील  विविध पार्कींग ठिकाणी उभी करून पायी प्रवास केला. त्यामुळे पालखी मार्गावर केवळ भाविकांचीच अलोट गर्दी दिसून आली. प्राप्त माहितीनुसार तब्बल एक लाखाहून अधिक भाविक या वारीत सहभागी झाल्याचे समजते. शेगावच्यावेशीवर पालखी पोहोचताच गण गण गणात बोतेचा गजर करण्यात आला. श्री गजानन महाराज संस्थान आणि शेगाव येथील भाविकांच्यावतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

श्रींच्या पालखींच्या ठिकठिकाणी स्वागतश्री गजानन महाराजांच्या पालखीसोबत जाणार्या हजारो भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, नास्ता, फराळ, जेवण आणि नि:शुल्क औषध वितरणाचीही सोय उपलब्ध करण्यात आली.  दिंडी मार्गांवर महिला भाविकांसाठी १८ तर पुरूषांसाठी ६ अस्थायी स्वच्छता गृहेही उभारण्यात आली. त्याचवेळी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने स्वच्छता सेवाही येथे पुरविण्यात आली.  

दिंडी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्तपालखी मार्गांवर तसेच शेगावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पालखीसोबतच भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली.

पालखी मार्ग पालखीसाठी बंदश्रींच्या पालखी मुळे खामगाव-शेगाव मार्गावरील वाहतूक पर्यांयी मार्गाने वळविण्यात आली होती. खामगाव-जलंब आणि खामगाव- जवळा या पर्यायी मार्गाने ही वाहतूक सुरू होती. सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत हा मार्ग बंद होता.

टॅग्स :ShegaonशेगावkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणाGajanan Maharajगजानन महाराजPandharpur Wariपंढरपूर वारी