शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:54 IST

Khamgaon news वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: खामगाव-शेगाव तालुक्यातील रेती घाटामधून शासनाला एक रुपयाही न भरता वाळूतस्कर हजारो ब्रास रेतीचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला जाणारा कोट्यवधींचा महसूल तस्करांच्या खिशात जात आहे. याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेचीही साथ लाभत असल्याने वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.नदी-नाल्यातील वाळू हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. परंतु, खामगाव-शेगाव तालुक्यातील घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो असतानाही प्रत्यक्षात या घाटांमधून मोठया प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे.  महसूल यंत्रणाही कुठे प्रामाणिकपणे तर कुठे केवळ देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा करताना दिसत आहे. खामगाव- शेगाव तालुक्यांमध्ये वाळूतस्करांची प्रचंड दहशत आहे. 

२४ बाय ७ पथक नावालाच!वाळू तस्करी रोखण्यासाठी 24 बाय 7 पथक गठीत करण्यात आले आहे. मात्र, या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रेती तस्करांशी साटेलोटे आहेत. त्यामुळे खामगाव शहरात जलंब-पिंपळगाव राजा, शेगाव, शेलोडी, बुलडाणा मार्गे मोठ्याप्रमाणात रेती वाहतूक केली जात आहे.

रेती तस्करी रोखण्यासाठी दिवसा आणि रात्री देखील वेगळे पथक गठीत केले आहे. नुकत्याच ४-५ कारवाई केल्या आहेत. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्करी रोखण्यासाठी सर्वच विभागाच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.- अतुल पाटोळेतहसीलदार, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग