शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकार्‍यांचा शिक्षकांवर कार्यवाहीचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:05 IST

शासनाच्या संकलित चाचणीचा बोजवारा उडत असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांवर कार्यवाहीचा आदेश दिला. त्यांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर एका दिवसाचे वेतन थांबल्याचा शेरा दिल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसोनाळ्यात संकलित चाचणीचा बोजवारा विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : येथील जि.प. मुलांची केंद्र शाळेला शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख यांनी आज ८ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मित भेट दिली असता त्यांना शाळेत एकही विद्यार्थी हजर आढळला नाही. यामुळे शासनाच्या संकलित चाचणीचा बोजवारा उडत असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांवर कार्यवाहीचा आदेश दिला. त्यांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर एका दिवसाचे वेतन थांबल्याचा शेरा दिल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बसस्थानक परिसरात जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा आहे. यामध्ये एक ते सातवीपर्यंत ४00 च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांना १४ शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. वादग्रस्त मुख्याध्यापिका शोभा सारोळकर या असून, त्यांचा कार्यकाळ अनेक बाबतीत वादग्रस्त ठरला आहे. आज संपूर्ण राज्यभर संकलित चाचणी क्र.१ चा श्रीगणेशा झाला असून भाषा विषयाचा पेपर वेळेपत्रकानुसार ठरवण्यात आला होता. ही चाचणी वर्ग १ ते ८ करिता घेण्यात आली होती. संग्रामपूर तालुक्यात सर्वच शाळांवर ही परीक्षेला सुरुवात झाली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात ८ ते ११ या दरम्यान संकलित चाचणी- १ चे आयोजन करण्यात आले. त्यानुसार कार्यालयातील सर्व अधिकार्‍यांना परिसरातील शाळांना भेटी देण्याचे आदेश आहेत. यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा जि.प. मुलांच्या केंद्र शाळेला अचानक भेट दिली. यामध्ये शाळेत ४00 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर नसल्याने शिक्षणाधिकार्‍यांनाच चक्क डोक्यावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. त्यांना सर्व शिक्षक कार्यालयात बसलेले आढळले त्यांचा पारा चढला व त्यांनी हजेरीपत्रकावर शाळेची दयनीय अवस्था, शाळेचा ढेपाळलेला कारोभार, शिक्षकांचा पगार कपात करण्याचा शेरा दिला.

टॅग्स :Teacherशिक्षक