लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील ५४ प्रेमी युगुलावर दामिनी पथकाने गत सहा महिन्यात कारवाई केली. दरम्यान, सणासुदीच्या दिवसांत पे्रमी युगुलावर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे.शहरात मागील काही महिन्यात अनेक युवक-युवतींनी सैराट होवून आई वडीलांना अंधारात ठेवत स्वत:च्या मर्जीने विवाह उरकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रेमाच्या आणाभाका घेवून युवतींना हेरून काही युवक त्यांना गाडीवर फिरवितात. कॉफी शॉप, आईस्क्रीम पार्लर, धार्मिक स्थळी, बगीचे, पार्क, सिनेमा गह येथे नेतात. तसेच एखाद्या निर्जनस्थळी हातात हात घालून बिनधास्त असे चित्र बऱ्याच वेळा नजरेस पडते. मात्र या प्रकारापासून सदर मुला-मुलींचे नातेवाईक अनेकदा अनभिज्ञ असतात. मागील मार्च ते आॅगस्ट या सहा महिन्यात शहरातील विविध ठिकाणावरून येथील पोलीस विभागाच्या दामिनी पथकाने अशा २७ जोडप्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई केली आहे. सदर मुला-मुलींच्या नातेवाईकांना बोलावून पोलिसांकडून ताकीद देवून त्यांना सोडण्यात आले.
प्रेमीयुगुलांवर दामिनी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 15:07 IST