शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न बांधता फिरणाऱ्यांवर कारवाई : चार दिवसात ५६ हजारांचा दंड वसूल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 18:54 IST

कारवाईसाठी बुलडाणा नगर पालिकेने ९ पथके स्थापन केली आहे.

बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकांना बाहेर फिरताना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. मास्क न लावता फिरणाºया तसेच नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरुद्ध कारवाईसाठी बुलडाणा नगर पालिकेने ९ पथके स्थापन केली आहे. या पथकांनी १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाºयांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तीन दिवस शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतीष्ठाने बंद ठेवून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. मात्र, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र शहरात होते. प्रशासनाने आता प्रत्येक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे तसेच मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आदेश नसले तरी कोरोना संसर्गाविषयी नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर थुंकण्यास बंदी घालण्यात आली असून मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. नगर पालिकेने ९ पथकांची स्थापना करून शहरातील विविध भागात तैनात केले आहे. या पथकांनी १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाºयाना नागरिक आणि व्यापाºयांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक