जानेफळ: बाल लैंगिक अत्याचारप्रकरणात गेल्या एक महिन्यापासून फरार असलेल्या आरोपी गणेश बुटाले यास जानेफळ पोलिसानी सुरत येथून अटक केली आहे. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी त्यास मेहकर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.जानेफळ पोलिस ठाण्यात २ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार व ॲट्रासिटी कायद्यातंर्गत तक्रार दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी गणेश बुटाले हा फरार होता. दरम्यान तो सुरत येथे असल्याची माहिती जानेफळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यास सुरत येथून जानेफळ पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी मेहकर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस सुरतमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 11:48 IST