शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या नादात स्कॉर्पिअेा उलटली; चार ठार, चार जखमी; देऊळगाव राजातील दगडवाढी फाट्यानजीकची घटना

By निलेश जोशी | Updated: April 17, 2024 21:56 IST

दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.

देऊळगांव राजा: चिखली-जालना मार्गावर देऊळगाव राजा नजीक दगडवाडी फाट्याजवळ दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादाता स्कॉर्पीअेा उलटून झालेल्या अपघातामध्ये चार जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १७ एप्रिल रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातामध्ये वाहन चालक योगेश लक्ष्मणराव देशमुख (५०, रा. अंबाशी, ता. चिखली), वसंतराव देविदास देशमुख (४५, रा. अमानी, जि. वाशिम), अशोकराव भीमराव नाईक (६५, रा. सवणा, जि. वाशिम) आणि विलास जयवंतराव देशमुख (७६, रा. अंबाशी, ता. चिखली) हे चौघे ठार झाले आहेत. दरम्यान जखमीमध्ये गोपाळराव आबाराव देशमुख (४३), मीराबाई संजय देशमुख (४०), शालीनीबाई अनंत देशमुख (३४), अक्षरा संदीप देशमुख (१४) असे चार जण जखमी झाले आहेत.

हे सर्व जण एमएच-२८-बीक्यू-०६०६ क्रमांकाच्या स्कॉर्पिअेा गाडीने जालना येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी जात होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी एका दुचाकी चालकाला अेाव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात चालक योगेश लक्ष्मणराव देशमुख याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी डिव्हायडरला धडकून उलटली. यामध्ये चार जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. चिखली तालुक्यातील खैरव अंबाशी येथून ते जालना येथे जात होते. त्यावेळी दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामधील गंभीर जखमींवर डॉ. प्रिती दिवाकर व अक्षय गुट्टे यांनी तत्काळ उपचार सुरू केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात