शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संजय रायमलुकर यांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 08:40 IST

रायमुलकरांसह तिघे जखमी

बुलडाणा - मेहकर विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाहनाला वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्याने आ. रायमुलकर यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक, सुरक्षा रक्षक असे तिघेही जखमी झाले आहे. दरम्यान, तिघांनाही उपचारासाठी रात्री औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज जानेफळ- मेहकर मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

जानेफळ येथून संजय रायमुलकर हे आपल्या वाहनाद्वारे (एमएच-२८- ऐझेड-७७७१)  मेहकर येथे जात असताना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या व वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने (एनएच-२८-९८०१) जबर धडक दिली.  नायगाव दत्तापूर- भालेगाव दरम्यान हा अपघात झाला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की रायुलकर यांची गाडी ही रस्त्या लगतच्या नाल्यात पडून उलटी झाली तर वाळूची वाहतूक करणारे वाहन हे रस्त्यावरच उलटे झाले. या अपघातामध्ये संजय रायमुलकर यांच्यासह चालक पंजाब गुडदे आणि अंगरक्षक ज्ञानेश्वर निकस हे तिघेही जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातचे वृत्त कळताच युवा सेनाप्रमुख ऋषीकेश जाधव, माधवराव जाधव, बबनराव तुपे, समाधान साबळे, सचिन जाधव, अशिष रहाटे यांनी स्थानिक रुग्णालय गाठून त्यांची विचारपूस करत त्वरित औरंगाबाद येते हलविले. दरम्यान तिघांना काही प्रमाणात मार लागला असला तरी तो गंभीर स्वरुपाचा नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना