शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नवनिर्वाचित सभापती संगीता पांढरे यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 01:52 IST

चिखली पंचायत समितीमध्ये संगीता संजय पांढरे यांना सभापती पदावर निवडून दिले आहे.

चिखली(जि. बुलडाणा), दि. २0- पंचायत समितीकडून एक चांगले आणि शेतकर्‍यांसाठी पारदर्शक कारभार देणारे प्रतिनिधी पदावर असावेत, या अपेक्षेने जनतेबरोबरच शिवसेना, शेतकरी संघटना, पीरिपा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या संगीता संजय पांढरे यांना सभापती पदावर निवडून दिले आहे. खरे तर या पंचायत समितीमध्ये उपसभापतीही या मित्रपक्षाच्या अघाडीचा बसणार होता; परंतु हेतूपुरस्सरपणे खोडसाळपणा करून अर्ज भरण्यापासून आमच्या उमेदवाराला रोखल्या गेले. कोर्टात त्याचेही उत्तर संबंधिताना द्यावे लागेल; मात्र असे असले तरी चिखली पंचायत समितीच्या अखत्यारीत कॉंग्रेस पक्षासह शेतकरी संघटना व मित्रपक्षाचा माहोल निर्माण होण्यापासून आमचे स्पर्धक रोखू शकले नाही, असे उद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी काढले.चिखली पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचित सभापती संगीता संजय पांढरे यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, माजी सभापती दिलीप जाधव, बलदेवराव चोपडे, मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ, शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, सिदुसिंग राजपूत, स्वभाप जिल्हाध्यक्ष एकनाथ थुट्टे, बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, माजी सभापती सुधाकर धमक, लक्ष्मण अंभोरे, प्रकाश निकाळजे, युकाँ जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर तर आभार माजी सभापती संजय पांढरे यांनी मानले. यावेळी जि.प.गटनेते संतोष पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या जयश्री शेळके, धाड सरपंच रिजवान सौदागर, राजू पाटील, विश्‍वास पाटील, रसुल खान, डॉ.. पुरूषोत्तम देवकर, दीपक देशमाने, प्रकाश भुतेकर, ईश्‍वर इंगळे, ज्ञानेश्‍वर सुरूशे, बिदेसिंग इंगळे, विजय पाटील, रूपराव पाटील, गजानन मोरे, गजानन पवार, भारत म्हस्के, शिवनारायण म्हस्के, किशोर आराख, अँड.विश्‍वास बाहेकर, प्रल्हाद इंगळे, रामधन मोरे, सखाराम भुतेकर, बबन गिर्‍हे, सतीश मेहेन्द्रे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर, न.प.सभापती दत्ता सुसर, श्रीराम झोरे, माजी जि.प.सदस्य अशोक पडघान, नंदू सवडतकर, किशोर कदम, डॉ.इसरार, अमिन खा, शिवाजी देशमुख, लता तायडे, संगीता पवार, कौतिकराव पाटील, अमोल तायडे, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, जि.प.सदस्य ज्योती पडघान, गोदावरी धमक, पं.स.सदस्य फरीदा पटेल, जुलेखा पटेल, उषा थुट्टे, कोकीळा खपके, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, राम जाधव, विलास चव्हाण, तुषार भावसार, राहुल सवडतकर, शैलेश बावीस्कर, दीपक खरात, अँड..विलास नन्हई, पवन गवारे आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठय़ा संख्येने हजर होते.