शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अकोला जिल्हा परिषदेतील अधिकार्‍याची स्वेच्छानवृत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:57 IST

अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी हे आरोप  फेटाळले आहेत. 

ठळक मुद्देअकोला जिल्हा परिषदेतील प्रकारसरकारकडे केला थेट अर्जमंत्र्यांनी मात्र आरोप फेटाळले! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी हे आरोप  फेटाळले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये  गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढलेली निविदा मंजूर करण्यासाठी  आपल्यावर दबाव आणला. तसेच, अशा प्रकारे निविदा मंजूर करणे नियमबाहय़ असल्याचे आपण  निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अतिशय अपमानास्पद व असंसदीय भाषा वापरून आपला अपमान केला. एवढेच नाही, तर एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आणल्याचा आरोप जि.प.चे अति. कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून स्वेच्छा नवृत्ती घेत असल्याचे कळविले आहे.  

अकोला जिल्हा परिषदेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा होण्याचे काम अतिशय कमी आहे. त्यामुळे निर्देशांचे अनुपालन का होत नाही, याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला. नाराजी व्यक्त केली. हे सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांच्या समक्ष घडले आहे.  त्यामुळे सुभाष पवार यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. - डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री.

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलzpजिल्हा परिषदAkola cityअकोला शहर