शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ९१ प्रकल्पामध्ये अवघा साडेतीन टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:59 IST

वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्दे लघु प्रकल्पामध्ये अवघा १.३२ टक्के पाणीसाठा असून २.३१ दलघमी ऐवढाच जलसंचय यात आहे. लघु प्रकल्पांमध्ये ८.२० टक्के पाणीसाठा असून दलघमीमध्ये तो ११.१६ दलघमी आहे. पेनटाकळीत अवघा ४.८२ दलघमी आणि खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ८.१६ दलघमीच पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या पाच वर्षातील निच्चांकी पातळीवर जिल्ह्यातील ९१ प्रकल्पातील जलसाठा पोहोचला असून मान्सून तथा मान्सूनपूर्व पावसाने येत्या काळात जिल्ह्यात दमदार हजेरी न लावल्यास पाणीटंचाईची दाहकता संपूर्ण जिल्ह्यालाच कवेत घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१८ अखेर जवळपास ३६ दलघमी पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आले होते. तर वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये अवघा १८.६५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यावरून शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी समस्या किती गंभीर बनतेय याची कल्पना यावी. पाणी आरक्षण समितीच्या बैठकीदरम्यानच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ५० पाणीपुरवठा योजनांनाच अल्प पाणीसाठ्यामुळे पाणी आरक्षण देता आले नव्हते. आता तर प्रकल्पच कोरडे पडले असल्याने समस्या तीव्र बनत आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा विचार करता मोठे दोन प्रकल्प, दोन मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहे. ९१ पैकी ६५ पेक्षा अधिक लघू प्रकल्प आज कोरडेठाक पडले आहे आहे. लघु प्रकल्पामध्ये अवघा १.३२ टक्के पाणीसाठा असून २.३१ दलघमी ऐवढाच जलसंचय यात आहे. लघु प्रकल्पांमध्ये ८.२० टक्के पाणीसाठा असून दलघमीमध्ये तो ११.१६ दलघमी आहे. जेमतेम काय मध्यम प्रकल्पातच काय जो पाणीसाठा आहे तो आहे. मोठ्या प्रकल्पामध्ये तर नळगंगा प्रकल्पातच एकमेव उपयुक्त पाणीसाठा आहे. पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्प मृतसाठ्यात गेल असून पेनटाकळीत अवघा ४.८२ दलघमी आणि खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ८.१६ दलघमीच पाणीसाठा आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर