शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अपहरण करून पाच लाखांची मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:25 IST

अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: एकाचे अपहरण करून त्यास एका खोलीत डांबून ठेवत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे यांचा समावेश आहे.अमडापूर येथे एका टिनशेडमध्ये हिवरा खुर्द येथील विलास अर्जूनराव शेळके (४२) यास अमडापूर येथील राहूल देविदास माहापुरे आमि बोरगाव काकडे येथील श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी डांबून ठेवले होते. सोबतच पाच लाखांची खंडणी त्यांना मागत होते. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान विलास अर्जून राव शेळके यास डांबून ठेवल्या गेले होते. सोबतच या दरम्यान विलास शेळके यास मारहाण करून जखमीही करण्यात आले होते. मधल्या काळात त्याने कशीबसी सुटका करून अमडापूर पोलिस ठाणे गाठले होते. प्रकरणी श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अन्य तिघे जण फरार झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून विलास शेळके याचे अपहरण करून त्यास डांबून ठेवले होते ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. सोबतच त्यास खंडणी कोणत्या कारणावरून मागण्यात येत होती ही बाबबी सांगण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी