शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 22:40 IST

माेताळा ते वडगाव रस्त्यावरील अंत्री शिवारातील घटना

संदीप वानखडे / बुलढाणा, मोताळा : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह दाेघे ठार झाले. ही घटना ३ जून राेजी सायंकाळी पाच वाजता माेताळा ते वडगाव रस्त्यावर अंत्री शिवारात घडली. दीपक महादेव पवार (रा. अंत्री) आणि गजानन जगदेव सोळंके (रा. लिहा) अशी मृतांची नावे आहेत.

माेताळा तालुक्यातील अंत्री येथील दीपक महादेव पवार आणि लिहा येथील गजानन जगदेव सोळंके हे दोघे मावसभाऊ आज ३ जून रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एम.एच. २८/ ए. एक्स./ ५७०५ क्रमांकाच्या दुचाकीने मोताळ्याकडून वडगावकडे जात होते. दरम्यान अंत्री शिवारात त्यांची भरधाव दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोकॉ. सुनील भवटे आणि गणेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या मदतीने दोघांना उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील मृत गजानन सोळंके हे आर्मीत असून १५ दिवसांच्या रजेवर घरी आले होते. वृत्त लिहेपर्यंत बोराखेडी पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

१५ दिवसांच्या सुटीवर आले हाेते साेळंकेभारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत असलेले जवान गजानन जगदेव सोळंके हे अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. पाच-सहा दिवसांअगोदरच ते सुट्टीवर आपल्या गावी लिहा येथे आले. पुणे येथे विमानतळावर कार्यरत दीपक महादेव पवार यांना भेटण्यासाठी त्यांनी पुण्यावरून बाेलावले हाेते. दोघेही दुपारी दुचाकीने मोताळा येथे गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा