शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू 

By निलेश जोशी | Updated: October 12, 2023 20:22 IST

तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे.

बुलढाणा : तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. दरम्यान उत्तराखंडमधील राज्य आपत्ती निवारण विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. ८ ऑक्टोबर पासून बुलढाण्यातील भाविकांचा एक गट तिर्थयात्रेवर गेलेला आहे. या गटासोबतच बुलढाण्यातील दिलीप रघाणी हे सपत्नीक गेले आहे. दरम्यान १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पींडदान विधी पारपडाल. त्यानंतर बुलढाणा शहरातील कारंजा चौकानजीक रहाणाले दिली रघाणी हे अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर आले. तेथे अचानक त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले. त्यांचा शोध युद्ध स्तरावर सुरू असून हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जात आहे. दरम्यान ही घटना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी घडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. बुलढाणा व चिखली येथून जवळपास २४ भाविक यात्रेसाठी गेले असल्याची माहिती जय अंबे ट्रॅव्हल्सचे सचीन चौहाण यांनी दिली. दरम्यान यासंदर्भात बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की उत्तराखंड सरकारकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आम्हास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

नदीचे पाणी आणण्यासाठी होते गेले बद्रीनाथ येथे दर्शन व सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दिलीप रघाणी व अन्य एक जण हे नदीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. अलकनंदा अर्थात गंगा नदीच्या पाण्याला पवित्र मानल्या जाते. त्या भावनेने ते गेले होते. दरम्यानच्या काळात ही घटना घडली. दरम्यान या घटनेमुळे त्यांच्या समवेत असलेल्या एका भाविकालाही शॉक बसला आहे. या यात्रेत दिलीप रघाणी यांची पत्नी सुष्माही सोबत असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक व जय अंबे ट्रॅव्हलर्सचे सचीन चव्हाण यांनी दिली.

उद्या पुन्हा बचाव पथक घेणार शोधसायंकाळ पर्यंत दिलीप रघाणी यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली तेथून जवळच नऊ किमी अंतरावर एक धरण आहे. आता बचाव पथक १३ ऑक्टोबर रोजी त्या भागात त्यांचा शोध घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यू