शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू, मोताळा येथील निर्माणाधिन पुलाजवळील घटना

By संदीप वानखेडे | Updated: January 22, 2024 17:04 IST

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शे. अनसार शे. मुसा हे २१ जानेवारी रोजी कामानिमित्त मोताळा येथे आले होते.

मोताळा : भरधाव दुचाकीचा अपघात झाल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना २१ जानेवारी राेजी रात्री माेताळा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर निर्माणाधीन पुलाजवळ घडली. शे. अनसार शे. मुसा (रा. कोथळी) असे मृतक युवकाचे नाव आहे.

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शे. अनसार शे. मुसा हे २१ जानेवारी रोजी कामानिमित्त मोताळा येथे आले होते. येथील ग्रामीण रुग्णालयासमोर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर पुलाच्या दोन्ही बाजूंनी मध्य भागापर्यंत मुरुमाचा आडवा बांध टाकण्यात आलेला होता. शे. अनसार हे कॉटन मार्केट रोडवरून परत येत असताना रात्रीची वेळ असल्याने पुलावर आडवा टाकलेला मुरुमाचा बांध त्यांना अंधारात दिसला नाही. त्या बांधावरून शे. अनसार यांची दुचाकी जोरात आदळली. त्यानंतर दुचाकीवरील अनसार हे खाली फेकल्या गेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकर, नापोकाॅ विजय पैठणे, पोकॉ अभिनंदन शिंदे, दीपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमीला नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी बुलढाणा येथे हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

फलक असता तर वाचला असता जीव

येथील ग्रामीण रुग्णालयासमोर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याठिकाणी मुरुमाचा आडवा बांध टाकण्यात आलेला आहे. याठिकाणी संबंधितांनी काम सुरू असल्याचे कोणतेही फलक लावलेले नाही. तसेच रात्रीची वेळ असल्याने मुरुमाचा आडवा बांध या दुचाकी चालकास दिसला नसल्याने हा अपघात घडला आहे. रस्त्याचे काम चालू असल्याचे फलक लावलेले असते तर दुचाकीचा अपघात घडला नसता आणि दुचाकी चालकाचे प्राण वाचले असते, असे सांगत मृतकाच्या नातेवाइकांनी संबंधित ठेकेदारावर रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :MotalaमोताळाAccidentअपघात