मोताळा: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व तालुका विधी सेवासमिती मोताळा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जुलै रोजी राष्ट्रियलोकदालतीचे आयोजन दिवाणी न्यायालय क स्तर मोताळा येथे करण्यात आले होते या लोकअदालत मध्ये पॅनल प्रमुख मोताळा येथील दिवाणी न्यायाधीश दडेयांनी काम पाहिले तर पंच म्हणून के पी परमार यांनी काम पाहिले.लोकन्यायालयात एकूण ९१ प्रकरणाचे व तडजोड प्रकरणामध्ये समजोता घडून आला वतडजोड शुल्क स्वरुपात ४६२०० वसुल झाले. राष्ट्रिय लोकअदालत यशस्वीतेसाठीन्यायालयीन कर्मचारी बोराखेडी, धामणगांव बड़े पोलिस स्टेशनचे कर्मचारीतसेच जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोताळावकील संघाचे अध्यक्ष आर. एल. चोपडे आदींनी सहकार्य केले.
लोकअदालत मध्ये ९१ प्रकरणाचा निपटारा
By admin | Updated: July 9, 2017 14:11 IST