शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

डिसेंबरमध्ये 9537 मालमत्तांचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST

एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून ...

एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये ही सूट देण्यात आली होती. तेव्हापासून ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली. २०१९ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत २६ कोटी ४२ लाख ६१ हजार ३५० रुपयांची उलाढाल झाली होती. पूर्वी मुद्रांक शुल्काचा दर अधिक होता. त्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होती. मात्र आता मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आल्याने दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले असून मालमत्ता खरेदी, गहाण खत, बक्षीसपत्र, हस्तांतरण, हक्क सोडपत्र व्यवहारांचा यात समावेश आहे. बक्षीसपत्रांचे प्रमाणही त्यामुळे वाढले असून रक्ताच्या नात्यातील रखडलेल्या व्यवहारांनीही यात वेग घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ४,५९५ व्यवहार झाले तर ऑक्टोबरमध्ये ४,४७८, नोव्हेंबरमध्ये ४,९०१ आणि डिसेंबरमध्ये ९,५३७ व्यवहार झाले. चारही महिन्यांचा विचार करता २३ हजार ५११ मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आहेत.

दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन चलान भरल्यास ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. त्याअनुषंगाने रखडलेले व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी केलेली होती. शेवटच्या दिवशीही हे चित्र होते.

चार महिन्यांत ३२ कोटींची झाली उलाढाल

जिल्ह्यात चार महिन्यांत ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून उलाढाल झाली. ती महिन्यात सर्वाधिक १२ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपये एवढी होती.

नोंदणी फीपोटी ९ कोटी ९४ लाख २८ हजार ७६५ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे. गेल्या वर्षी शेवटच्या चार महिन्यांत पाच कोटी ५७ लाख ५७ हजार ३८५ रुपये नोंदणी फीपोटी मिळाले होते.

चार महिन्यांत ९० टक्क्यांनी व्यवहार वाढले आहेत. मुद्रांकापोटी डिसेंबर २०२० मध्ये ८ कोटी ८५ लाख ४५ हजार २३५ रुपयांचा महसूल मिळाला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्कापोटी सात टक्के अधिकचा महसूल शासनास मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट

कामे गतिमान करण्यास प्राधान्य देण्यात येत असून आता इंटरनेट सुविधेचाही वेग वाढविण्यासाठी खासगी जोडणीचा आधार घेऊन कामाचा वेग वाढविण्यास प्राधान्य राहणार आहे. शासनाने दिलेल्या या सवलतीमुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

- नितीन शिंदे,

जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी

कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना

कोरोना संसर्गाचा काळ पाहता अनुषंगिक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळण्यावर भर दिला गेला होता. डिसेंबर महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात वाढलेली गर्दी पाहता अनुषंगिक सूचना दिल्या गेल्या होत्या.