शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ९१० बसफेऱ्या बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:53 IST

Buldhana News लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या सर्वाधिक प्रवासी मार्गावरील बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतरही ग्रामीण भागातील काही बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सात आगारामधून लॉकडाऊनपूर्वी दिवसाला ३ हजार १९२ बसफेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर टप्याटप्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाले असून, प्रवासी संख्याही वाढली आहे. वाढती प्रवासी संख्या पाहता एसटी महामंडळाने बसेस वाढविण्यावर भर दिला आहे. ३ हजार १९२ बसफेऱ्यांपैकी सद्यस्थितीत २ हजार २८२ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या बंदच असल्याचे दिसून येते. काही भागामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता, केवळ विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे  एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. 

सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. लॉकडाऊनपूर्वी असलेल्या बसेस सुरू करणे आवश्यक आहे. आता प्रवाशी संख्या वाढलेली आहे. बसस्थानकावरही गर्दी दिसून येते. बसेस वाढविणे  फायद्याचेच आहे. -अमोल गरड, प्रवासी. 

पाचवी ते आठवीच्या शाळाही आता सुरू झाल्या आहेत. परंतू ग्रामीण भागातील बसेस बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी बसेस सुरू करण्याची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ऑटोकरून शाळेत जावे लागत आहे. मानव विकासच्या बसेसही बंद आहेत. -रुपेश जगताप, प्रवासी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी