शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती;  अपघातात ९ वर्षांची चिमुकली बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 11:18 IST

9-year-old girl survived the accident : प्रत्यक्ष संपूर्ण घटनाक्रम बघणारी ही चिमुकली अत्यंत भेदरलेली आहे.

- विठ्ठल देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कराहेरी बुद्रुक : सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर १३ जणांचा जीव घेणाऱ्या यमाच्या तावडीडून ९ वर्षांची चिमुकली बचावली आहे. काळाने तिच्यावरही झडप घालण्याचा प्रयत्न केला; पण तिची वेळ आली नव्हती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, प्रत्यक्ष संपूर्ण घटनाक्रम बघणारी ही चिमुकली अत्यंत भेदरलेली आहे. त्यामुळे काय बोलावे हेही तिला सुचत नव्हते.

छबू गावड, असे या चिमुकलीचे नाव आहे. समृद्धी महामार्गाच्या साखळी क्रमांक ३१९ वरून परत येत असताना ही चिमुकली टिप्पर चालकाच्या सोबत केबिनमध्ये बसलेली होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देण्यासाठी टिप्पर चालक त्याचे वाहन बाजूला घेत असतानाच अपघाताची जाणीव होताच त्याने छबूला धक्का देत केबिनमधून बाहेर लोटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर तरोटा आणि गाजर गवत उगवलेले आहे. त्यावर अलगद ही चिमकुली फेकली गेली व दैव बलवत्तर म्हणून ती बचावली.चालकही बचावलाया घटना क्रमादरम्यान चालकही थोडक्यात बचावला आहे. छबूला केबिनमधून बाहेर ढकलत तोही बाहेर पडला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता त्यानेही अपघातातील जखमींसोबत जालना गाठले असल्याची माहिती आहे. विवेक राॅय असे या वाहन चालकाचे नाव आहे. ३० वर्षीय  विवेक राॅय हा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. रात्री १०.२० वाजता त्याला किनगावराजा पाेलीस ठाण्यात आणण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात