सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील जांभोरा येथील एका शेतातील गोठय़ाला आग लागून ९0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. जांभोरा येथील कालिंदाबाई रायभान खरात यांच्या शेतातील गोठय़ाला अचानक आग लागली. त्यामध्ये स्पिंकलर, पेट्रोल पंप व इतर शेती पयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे खरात यांचे ९0 हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. तलाठय़ांनी घटनेचा पंचनामा केला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते.
गोठय़ाला आग लागून ९0 हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 01:40 IST