लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांपैकी ८८ टक्के कार्डधारक नियमतीत स्वस्त धान्य उचलतात. त्यामुळे उर्वरीत कार्डधारकांच्या ठिकाणी गरजवंतांना त्यात समाविष्ट करण्यात येत आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्याच्या माध्यमातून गरीब व गरजुंना अल्पदरात धान्याचे वाटप करण्यात येते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्टभूमीवर लॉकडाऊनच्या काळाता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजने अंतर्गत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे कार्डधारकांना मोफत धान्य वितरणक सुरू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये गहू तीन किलो प्रति सदस्य मोफत, तांदूळ दोन किलो प्रति सदस्य मोफत, चणाडाळ एक किलो प्रतिकार्डधारक मोफत देण्यात येत आहे. परंतू यामध्येही जिल्ह्यातील अनेक रेशनकार्डधारक हे स्वस्त धान्य नियमीत उचलत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात रेशन कार्डधारकांची संख्या ५ लाख ५४ हजार ४०६ आहे. त्यापैकी ४ लाख ८७ हजार ९६७ कार्डधारक नियतीत स्वस्त धान्य घेत आहेत. त्यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यादीसह शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के कार्डधारक घेताहेत स्वस्त धान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:07 IST