शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

८७ टक्के व्यक्तींचे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष; मौखिक कर्करोगाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:59 IST

बुलडाणा : बालपणी मनुष्याच्या तोंडातील दुधाच्या दातांची संख्या २0 असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ३२ पैकी किमान २0 दात सुस्थितीत असणे, मौखिक आरोग्याविषयी अभ्यास करणार्‍या फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल (एफडीआय) या संघटनेला अपेक्षित आहे; मात्र ८७ टक्के व्यक्ती मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशाळांमध्ये जनजागृती व पोस्टर स्पध्रेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बालपणी मनुष्याच्या तोंडातील दुधाच्या दातांची संख्या २0 असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ३२ पैकी किमान २0 दात सुस्थितीत असणे, मौखिक आरोग्याविषयी अभ्यास करणार्‍या फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल (एफडीआय) या संघटनेला अपेक्षित आहे; मात्र ८७ टक्के व्यक्ती मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.मौखिक आरोग्य दिनाच्या पृष्ठभूमीवर याबाबत जाणून घेतले असता ही माहिती समोर आली. दरम्यान, जगातील १३६ देशांमधील दंत वैद्यांच्या १९१ संघटना यंदाचा जागतिक मौखिक आरोग्य दिन ५ फेब्रुवारी रोजी साजरा करीत आहेत. यानिमित्ताने बालकांपासून वृद्धांपर्यंत मौखिक आरोग्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचे निदान कर्करोग पूर्व लक्षणांमध्ये झाले, तर कर्करोग बरा होण्याचा दर ७0 ते ७५ टक्के असतो. हे लक्षात घेऊन राज्यात डिसेंबर २0१७ मध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोही आरोग्य विभागांमार्फत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांत राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये २ कोटी ८ लाख ४0 हजार ८५२ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांमध्ये मौखिक अस्वच्छता आढळून आली. त्यांना मौखिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जागतिक कर्करोग दिन, मौखिक आरोग्य दिनानिमित्त ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणारे कार्यक्रमजिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानुसार ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दररोज मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, संबंधित रुग्णांची फेरतपासणी व संशयितांची बायोप्सी करण्यात येणार आहे. तसेच ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी जनजागृती कार्यशाळा, कर्करोगावर समुपदेशन व व्याख्याने, ६ ते ७ फेब्रुवारी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत विविध विभागाशी चर्चासत्र, ८ फेब्रुवारी रोजी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत पोलीस विभागाबरोबर बैठक, ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत सर्व शाळेत माहिती देणे, पोस्टर स्पर्धा घेणे, तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी मार्गदर्शन, शिक्षकांना तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रवृत्त करणे, १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा माहिती अधिकार्‍यांच्या साहाय्याने कर्करोगासंबंधी जनजागृती करणे व १६ फेब्रुवारीदरम्यान स्त्रीरोग चिकित्सकांकडून गर्भाशय मुख कर्करोग, स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

मौखिक आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मौखिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, तंबाखू, गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहून आपले मौखिक व शारीरिक आरोग्य चांगले ठेवावे.-डॉ. प्रकाश अंभोरे, दंत चिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य