शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बुलडाणा जिल्ह्यात ८.५२ लाख वृक्षांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 00:33 IST

१ जुलैपासून अंमलबजावणी : पर्यावरण उपयुक्त झाडे लावणार

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात १ जुलैपासून ४ कोटी वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून, प्रशासनाचे विविध विभाग या योजनेत सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ४ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या ८५९ ग्रामपंचायतींनी पर्यावरण उपयुक्त झाडे लावण्यात येणार आहे.यावर्षी जिल्ह्यात ज्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे त्यामध्ये जीवनदायी वृक्ष-वड, उंबर, पाखर, नांदूक, पिंपळ. फळ झाडे -बोर, चिंच, आवळा, मोहा, टेभुर्णी, जांभूळ, नारळ, शिवण, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा. मंदिराभोवती लावण्यास योग्य -पिंपळ, बेल, शमी, आपटा, चाफा, कडुलिंब. रस्त्याच्या कडेला लावण्यास योग्य-कडुलिंब, सप्तपर्णी, करंजी, पिंपळ, चिंच, शिसव. शेताच्या बांधावर उपयुक्त-शिंदी, ताडफळ, बांबू, शेवगा, तुळस, कढीलिंब. शेताच्या कुंपणासाठी उपयुक्त-सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी, घायपात, एरंड. सरपणासाठी उपयुक्त-देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू. औषधी उपयुक्त-हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुलिंब, करंज, रिठा, निरगुडी, सिवन. वनशेतीसाठी उपयुक्त- आवळा, अंजीर, फणस, चिंच, सिरणी, सिंदी, तुती, करवंद. शेत जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयुक्त-उंबर, करंज, शेवरी. घराभोवती उपयुक्त-चंदन, रक्तचंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल. बारा तासापेक्षा जास्त प्राणवायू देणारी उपयुक्त-वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, कदंब. औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण निवारणार्थ उपयुक्त-पिंपळ, पेल्टोफेरम, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सीताफळ, सप्तपर्णी, पेरू, बोर, कडूलिंब, आवळा चिंच, कदंब, बेल. धुळीकण व विषारी वायू निवारणार्थ उपयुक्त-आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री, जास्वंद, पारिजात, राजराणी, मेहंदी, तुळस. हवामान स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त-पळस, सावर, कदंब, गुलमोहर. हवेतील प्रदूषण दर्शवण्याठी उपयुक्त-हळद, पळस, चारोळी. रस्त्याच्या मध्यभागी लावण्याठी उपयुक्त-कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्वगंधा व निवडुंग या झाडांचा समावेश आहे....असा राहणार मोहिमेचा कार्यक्रमराज्यात पहिल्या टप्प्यात ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कालावधी १ ते ७ जुलै २०१७ राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१८ राहणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१९ राहणार आहे.