शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी ८ जणांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:37 IST

Court order News सुलतानपूर येथील जामा मशीदच्या अध्यक्षपदावरुन वाद झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकरः लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे धार्मिक स्थळाच्या अध्यक्षपदावरून झालेल्या मारहाणप्रकरणी आठ जणांना लोणार न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, दंड न भरल्यास संबंधितांना एक महिन्याची साधी कैद अशी तरतूदही या निकालात करण्यात आली आहे.सुलतानपूर येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुलतानपूर येथील जामा मशीदच्या अध्यक्षपदावरुन वाद झाला होता.  त्यावेळी आरोपी  शे. दस्तगीर शे. उमर, शे. ख्वाजा शे. उमर, शे. हनीफ शे. उमर, शे. आमीर शे. उमर,  शे. उमर शे दादामिया, शे. हमीद शे. उमर, शे. मोहसीन शे. असद, जाकीर खा शौकत खा पठाण यांनी २४ जानेवारी २०१४ रोजी दुपारी संबंधित धार्मिक स्थळाच्या प्रांगणामध्ये  शे. नासिर शे. गणी,  शे. इर्शाद शे. रेहमान,  शे. फिरोज शे. रेहमान,  शे. सोहेल शे. इरफान यांना जबर मारहाण केली होती.याप्रकरणी सुलतानपूर पोलीस चौकीत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.  या हाणामारीत इर्शाद आणि शेख फिरोज हे गंभीर जखमी झाले होते. शे. नासिरने दिलेल्या फिर्यादी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण पवार यांनी तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.  लोणार न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.  दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून लोणार न्यायालायने उपरोक्त आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी ५,५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी तरतूद, या निकालात करण्यात आली आहे. या प्रकरणात वादी पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली कस्तुरे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल कायंदे, धोंडगे आणि इंगले यांनी सहकार्य केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरCrime Newsगुन्हेगारी