शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी अद्यापही परराज्यात अडकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:40 IST

या विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील शिक्षणानिमित्त गेलेले ७६ विद्यार्थी पाच वेगवेगळ्या राज्यात ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यास केंद्र शासनाने मुभा दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मात्र या विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे पालक मात्र चिंतेत सापडले आहेत.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात ३ मे पर्यंत ‘लॉकडाउन’ आहे. ‘लॉकडाउन’ जाहीर होण्यापूर्वीपासून शिक्षणानिमित्त परराज्यात गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी परवानगी काढून त्यांना ‘लॉकडाउन’च्या पहिल्या टप्प्यातच परत आणले आहे. मात्र राज्यातील ‘कोरोना’बाधितांची वाढती संख्या पाहता काही विद्यार्थ्यांना परत येण्यास परवानगी नाकारण्यात आली. सद्य:स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थी राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, गोवा व मध्यप्रदेशमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये राजस्थानमधील कोटा येथे २९, हिमाचल प्रदेश २१, गुजरात १३, गोवा ३ तर मध्यप्रदेशमध्ये १० अशा एकुण ७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. मात्र याकरीता प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल सध्या उचलल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यास मुभा आहे.त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या २१ वरून ६ वर आल्याने जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या नजरा घराकडे‘लॉकडाउन’ ला जवळपास महिनाभरापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. शाळा व खासगी शिकवणी वर्गांनादेखील सुटी देण्यात आल्याने परराज्यात अडकून असलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आपसुकच गावाकडे वळल्या आहेत. अनेक विद्यार्थी घरी घेऊन येण्यासाठी पालकांकडे विनवणी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यातील परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनास देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना घरी सोडण्याची व्यवस्था शासन करणार आहे की पालकांना करायची आहे, याबाबत आतापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत.- डॉ. रामेश्वर पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या