शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

७ हजार हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: April 14, 2015 00:42 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ६१६ गावे बाधित; कांदा, मका, भुईमुगासह फळपिकांचे नुकसान.

बुलडाणा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ९ ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्ह्याला पुन्हा फटका दिला. या पावसाची ४६९.६0 मिमी एवढी नोंद करण्यात आली. या पावसामुळे जिल्ह्यातील कांदा, कांदा बी, मका, भुईमूग, केळी, भाजीपाला असे शेतपिके आणि लिंब, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ७ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाले असून, ६१६ गावे बाधित झाले.यात खामगाव, जळगाव जमोद, बुलडाणा, मोताळा, नांदुरा, शेगाव या सहा तालुक्यात प्रत्येक ५0 टक्केच्यावर पिकांचे व इतर नुकसान झाले. या तालुक्यामध्ये कांदा आणि कांदा बी या पिकांचे ७0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर बुलडाणा, खामगाव, जळगाव जमोद या तीन तालुक्यात ३0 टक्क्यांपेक्षा जास्त फळबागेचे नुकसान आहे. जिल्ह्याचा विचार करता या तीन दिवसांच्या पावसामुळे ७ हजार ११६ हेक्टरवरील शेतपिके आणि ६३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान जळगाव जमोद तालुक्यात झाले. गत तीन दिवसात तालुक्यात ७४ मिमी पाऊस पडला. या दरम्यान झालेल्या चक्रीवादळ व गाटपिटीमुळे १३६७ हेक्टरवरील शेतपिके व फळपिकांचे नुकसान झाले. तर ११९ गावांमध्ये घरांची पडझड होऊन कुटुंब उघड्यावर आली. तर त्या खालोखाल खामगाव तालुक्यात १२१५ हेक्टरवरील कांदा, कांदा बी, मका व इतर फळपिकांचे नुकसान झाले, तर ११0 गाव बाधित झाले.गत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याला सहा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे सोयाबीन, हरभरा, कापूस, कांदा, मका, तूर, मूग, शाळू आदी खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.