शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

बुलडाणा जिल्ह्यात ७० कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 9:43 AM

Crop loan disbursement in Buldana district : आतापर्यंत ८,२५० शेतकऱ्यांना ७० कोटी ९४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामास अवघा एक महिना राहिलेला असताना जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ असून, त्याचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ८,२५० शेतकऱ्यांना ७० कोटी ९४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १,३०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. जिल्हा बँकेची मधल्या काळातील खस्ता हालत पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर जिल्ह्यातील पीककर्जाची प्रामुख्याने मदार आहे. या बँकांना ९०४ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंदा गेल्यावर्षी एकूण उद्दिष्टाच्या किती टक्के पीककर्ज वाटप केले गेले आहे याच्या आधारावर पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेच यासंदर्भात निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचे उद्दिष्ट तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे दरवर्षी कर्ज घेणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या दृष्टीने बँकांनी आता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

जिल्हा बँकेने केले १८ टक्के कर्ज वाटपजिल्हा बँकेनेही गेल्या दोन वर्षांपासून पीककर्ज वाटप सुरू केले असून, यावर्षी जिल्हा बँकेला ६६ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी २,३२९ शेतकऱ्यांना बँकेने आतापर्यंत १५ कोटी ३९ लाख १२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या १८ टक्के हे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, १,३०० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे बँकेला उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी