शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:05 IST

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात खरीपाची ६९.८४ टक्के पेरणी झाली आहे. पाउस नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. १०० मीमी पाउस झालेला असेल तर बिज अंकुरण्यास १२ दिवसांचाही अवधी लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.मृग नक्षत्रात सर्वदूर पाउस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह अनेक पिके उगवलीच नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिमी पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्ला शेतकºयांना दिला होता. मात्र, काही शेतकºयांनी अल्प पावसातही पेरणी केली. ज्या भागात ८० ते १०० मिमी पाउस झाला त्या भागातील पेरणी केलेल्या शेतकºयांनी दुबार पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. काही वेळा १२ दिवसांनी बियाणे उगवू शकते. बि जमीनीवर खोलवर गेल्याने उगवले नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुबार पेरणी करण्यापूर्वी काही दिवस प्रतीक्षा करावी,असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कपाशीची ९२ टक्के पेरणीजिल्ह्यात खरीप हंगामात ६९.८४ टक्के पेरणी आटोपली आहे. एकूण सात लाख ३४ हजार हेक्टरवर १७७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी पाच लाख १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून ९२ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उसाची ९१ टक्के,सोयाबीन ६४.२९ टक्के पेरणी झाली आहे.ज्या भागात १०० मिमी पेक्षा जास्त पाउस व मॉइश्चर असेल तर दुबार पेरणीची घाई करु नये. बियाणे खोलवर गेले असेल तर उगवण होईलच. तसेच १०० मिमी पेक्षा कमी पाउस असल्यास पेरणी करू नये.-नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी