या ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरबीड परिवर्तन पॅनल व दुसरबीड विकास आघाडीचे पॅनल आमनेसामने लढत आहेत. दुसरबीड परिवर्तन पॅनलचे वार्ड क्र. ६ मधील एक उमेदवार अविरोध असल्याने दोन्ही पॅनलकडून १६-१६ उमेदवार रिंगणात आहेत, तर ३ उमेदवार अपक्ष असल्याने एकूण उमेदवारांची संख्या ३५ एवढी आहे. शुक्रवारी या उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहे. एकूण ७ हजार २४३ मतदानापैकी ४ हजार ९३८ मतदान झाले आहे. येत्या १८ जानेवारी रोजी उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, या निवडणुकीत कोणाला यश मिळेल, याची जुळवाजुळव उमेदवार व निवडणुकीतील व्हाॅट्सॲप कार्यकर्ते राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक दिव्यांगांनी मोठ्या चुरशीच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
दुसरबीडमध्ये ६८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST