शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:51 IST

शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमीत शाळा सुरू करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ६२४ शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत. परंतू प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांची पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आलेल्या अहवालाची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या ६२४ शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत नकार दर्शविला आहे. शाळा स्तरावर पालकांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली असता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. अद्याप इतर काही शाळांचे अहवाल येणे बाकी असले तरी, जास्त शाळांकडून नकारात्मक सूर येत असल्याने शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्स्तुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत लेखी स्वरूपात कुठलेच आदेश मिळालेले नाही. मात्र आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.वाहतूकीचा प्रश्नकाही शिक्षण संस्थाकडे स्वत: च्या स्कूल बस नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतूकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलया जाऊ शकत नाही.काय आहे पालकांची भूमिका...प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. विद्यर्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.

नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्था व पालकांचे मत जाणून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६२४ शाळांनी वर्ग सुरू करण्याला नकार दिला. शासनाकडून येणाऱ्या सुचनानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

 

 

 

टॅग्स :SchoolशाळाbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र