शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहनपर रकमेपासून ६२ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:25 IST

नियमित कर्ज भरणारे ६२ हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.

- विवेक चांदुरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नियमित कजार्ची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा महाआघाडी सरकारने केली होती. मात्र अद्याप त्याची अधिसूचनाही काढण्यात आली नाही. जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणारे ६२ हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.जिल्ह्यात ३ लाख ६० हजार शेतकरी दरवर्षी पीककजार्चा लाभ घेतात.राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत यापैकी १ लाख ९० हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी १ लाख ५० हजार पेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ८७ टक्के शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ५२ हजार शेतकºयांचे कर्ज २०१५ पूवीर्पासून थकीत आहे. त्यामुळे या शेतकºयांना महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यात ६२ हजार शेतकरी नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत. शासनाच्यावतीने राज्यातील शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करताना, नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप कोणत्याच शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली नाही. त्यामुळे आघाडी शासनाला घोषणेचा विसर पडला की, काय असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करीत आहेत.नव्या हंगामाला चार महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकºयांना अनदान मिळाले नाही. त्यामळे महाआघाडीची घोषणा फसवी ठरत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये आहे. जिल्ह्यातील नियमित कजार्ची परतफेड करणारे ६२ हजार शेतकरी प्रोत्साहनपर मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात यावर्षी कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतमाल विक्री करण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने शेतकºयांना गावातील व्यापाºयांना कमी भावात शेतमालाची विक्री करावी लागली. त्यातच यावर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने मुग व उडीदाच्या पिकांचे ९० टक्के नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतातच झाडाला असलेल्या मुग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले तर काही भागात पीक काळे पडले आहे. हजारो हेक्टरवरील कपाशी पिकांची बोंड व पाने अतिपावसामुळे जमिनीवर पडली आहेत. तसेच शेतात पाणी साचल्यानेही शेकडो हेक्टरवरील पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी ओल्या दुष्काळाच्या सावटात आहेत. त्यातच सध्या परिस्थितीत किटकनाशक, रासायानिक खत व मजुरांचे वाढलेले दर लक्षात घेतल्यास अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकºयांना फवारणीसाठी पैशांची गरज आहे. मात्र शासनाकडून प्रोत्साहन निधी मिळाला नसल्याने शेतकºयांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरीत निधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नियमित कजार्ची परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले नाही.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बँक, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी