मोताळा : एका २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने पळवून नेले. याप्रकरणी युवतीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील संबंधीत युवतीच्या वडिलांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या २२ वर्षीय मुलीस तरवाडी येथील भास्कर जरीमल इंगळे (६०) याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. सदर घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेंबा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भास्कर जरीमल इंगळे याच्याविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल जंजाळ, पोकाँ मंगेश पाटील करीत आहेत.
६० वर्षीय वृद्धाने २२ वर्षीय युवतीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 20:25 IST
old man eloped with a 22-year-old girl भास्कर जरीमल इंगळे (६०) याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
६० वर्षीय वृद्धाने २२ वर्षीय युवतीला पळविले
ठळक मुद्देवडिलांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. भास्कर जरीमल इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.