शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:15 IST

मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देदिवाळीत हजारो गरीब अन्नधान्यापासून वंचित कर्मचारी, हमालांच्या संपाचा परिणाम

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. जवळपास ५६ टक्के स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळालेच नसल्यामुळे  अनेक खेडेगावात रेशनचा माल पोहचलाच नाही.शासनाने प्रत्येक खेडेगावात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. या दुकानांमधून गोरगरिबांसाठी गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य कमी भावात उपलब्ध करून दिले आहेत. या महागाईच्या काळात रेशनची ही योजना गोरगरिबांसाठी फायदेशीर ठरत असली तरी रेशनचा पुरेपूर माल खर्‍या लाभार्थींपर्यंत पोहचत नाही. जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या काळात रेशनच्या मालाचा मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. रेशनचा माल काळा बाजारात खुलेआमपणे विकल्या जातो. हा सर्व प्रकार जिल्ह्यात सर्वत्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ५६७ रेशन दुकाने असून, ४ लाख ३0 हजा शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. या माध्यमातून १७ लाख लोकांना धान्य वितरण करण्यात येते; मात्र अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संपामुळे पूर्ण जिल्ह्यात ५६ टक्के दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही.१७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली होती. तर १९ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना रेशनचा माल मिळणे गरजेचे असताना या काळात बुलडाणा जिल्हय़ातील सर्व महसूल विभागातील अन्नपुरवठा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. तसेच खामगाव येथे संबंधित ठेकेदार व हमाल यांचासुद्धा काही मागण्यासाठी संप सुरू होता. त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण  जिल्ह्यात अन्नधान्याचे वेळेवर वितरण होऊ शकले नाही. तर अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप असल्याने दुकानदारांना मालाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लाभार्थी रेशनच्या मालापासून वंचित राहिले आहेत. गरीबांना महागडे अन्नधान्य घेऊन दिवाळी साजरी करावी लागली आहे. 

मालाचे वितरण त्वरित व्हावे!काही अडचणीमुळे दिवाळी सणामध्ये ज्या दुकानदारांना माल मिळाला नसेल, त्या दुकानदारांना आता तरी मालाचे वितरण करून देऊन जे गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहिले त्यांना दिवाळी झाल्यावर मालाचे वाटप व्हायला पाहिजे, नाही तर काही दुकानदार आपल्या गावात संपूर्ण माल न नेता इतरत्र त्या मालाची विल्हेवाट लावतात व माल मिळालाच नाही, असे गावात सांगतात. त्यामुळे संबंधित गावच्या सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, दक्षता समिती आदींनी जागृत राहून आपल्या गावात अन्नधान्याचे वाटपावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संप यामुळे काही दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही. तरी पण अवघ्या काही दिवसातच सर्वांना मालाचे वितरण करून प्रत्येक गावात रेशनचा माल पोहचवू.-ए.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी,मेहकर

टॅग्स :zpजिल्हा परिषद