शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही गणवेशासाठी ४.२५ कोटी रुपयांचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:39 IST

Khamgaon News : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. 

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना काळातही जिल्ह्याला गणवेशासाठी शासनस्तरावरून चार कोटी २५ लाख १९ हजार ६०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या १४३८ शाळांच्या मुख्याध्यापकांना हा निधी सुपूर्द करण्यात आला. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी जानेवारीमध्ये पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या; मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने २१ फेब्रुवारीपासून परत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. यामुळे जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग जेमतेम २० ते २५ दिवसच ऑफलाइन झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता गणवेशासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्या तरी पालकांना सूचना देऊन ठराविक वेळेत गणवेशाच्या रकमेचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना गणवेशापोटी प्रत्येकी ३०० रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

या विद्यार्थ्यांना मिळतो मोफत गणवेश पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुलींना दरवर्षी शासनातर्फे मोफत गणवेशाचे वितरण करण्यात येते. तर एससी, एसटी व दारिद्र्य रेषेखालील मुलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात येतो. या सर्व पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेशांचे मोफत वितरण करण्यात येते; मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दोनऐवजी एकाच गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे.

शाळा बंद असल्या तरी दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून उपलब्ध निधी देण्यात आला होता. तालुकास्तरावर पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे हा निधी सोपवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना गणवेशाच्या रकमेचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.-उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. बुलडाणा. 

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थी