शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ४२ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:24 IST

Crop loss due to heavy rains Buldhana ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने अद्द्याप पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान केले नसले तरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात खरीपाचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, सप्टेंबरमधील या पावसामुळे ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालावरून ही बाब स्पष्ट होत आहे.दुसरीकडे जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसून जवळपास २६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते तर एकट्या सप्टेंबर महिन्यात पावसामुळे ४२ कोटी २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात चार कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यात तुलनेने कमी नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना सलग दुसऱ्यावर्षी फटका बसला आहे.

सिंदखेड राजातील सर्वाधिक शेतकरी बाधीतसिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे बाधीत झाले आहेत. ६४ हजार ७१० शेतकऱ्यांपैकी एकट्या सिंदखेड राजा तालुक्यातील ५९ हजार ४०१ शेतकऱ्यांचा बाधीतांमध्ये समावेश आहे. मेहकर तालुक्यातील दीड हजार शेतकरी, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१९ शेतकरी तर खामगाव तालुक्यातील दोन हजार शेतकरी संप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी